साईना, सिंधूकडून चिनी आव्हान पार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

वुहान (चीन) / मुंबई  - राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेती साईना नेहवाल आणि जागतिक तसेच ऑलिंपिक उपविजेत्या पी. व्ही. सिंधूने चीनमध्येच चिनी भिंत सहज सर करीत आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रतिस्पर्ध्याने काही वेळातच सामना सोडून दिल्याने किदांबी श्रीकांतला आगेकूच करण्यासाठी घामही गाळावा लागला नाही.

लंडन ऑलिंपिक ब्राँझविजेत्या साईनाने गाओ फॅंगजिए हिचे आव्हान २१-१८, २१-८ असे ४० मिनिटांतच परतवले. चीनच्या गाओने जागतिक विजेत्या नोझोमी ओकुहारा हिला पहिल्या फेरीत हरवून अपेक्षा उंचावल्या होत्या; पण साईनाच्या योजनाबद्ध खेळासमोर गाओ टिकू शकली नाही.

राष्ट्रकुल उपविजेत्या सिंधूने चीनच्या चेन झाओजिन हिला २१-१२, २१-१५ असे सहज हरवले. चिनी आव्हान परतवल्यानंतर भारतीय फुलराणींसमोर कोरियन आव्हान आहे. साईनाची लढत मानांकन नसलेल्या ली जॅंग मी हिच्याविरुद्ध होईल; तर सिंधूसमोर सातवी मानांकित सुंग जी ह्यून असेल.

राष्ट्रकुल फायनलची पुनरावृत्ती
श्रीकांत पहिल्या गेममध्ये ७-२ आघाडीवर असताना हाँगकाँगच्या वाँग विंग कि व्हिन्सेंटने लढत सोडून दिली. त्याच्यासमोर आता ली चोंग वेई याचे खडतर आव्हान असेल. राष्ट्रकुल स्पर्धेच्या सांघिक लढतीत श्रीकांतने वेईला हरवले होते; तर वैयक्तिक लढतीत श्रीकांत पराजित झाला होता.

ऑल इंग्लंड स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या एच. एस. प्रणॉयने तैवानच्या वॅंग झु वेई याला १६-२१, २१-१४, २१-१२ असे हरवले. ऑल इंग्लंडची उपांत्यपूर्व फेरी गाठलेला प्रणॉय आता द्वितीय मानांकित सोन वॅन हो याला पराजित करण्याचा प्रयत्न करेल. बी साईप्रणीत ऑलिंपिकविजेत्या चेन लाँगविरुद्ध १२-२१, १२-२१ असा पराजित झाला.

पुरुष दुहेरीत एम. आर. अर्जुन - श्‍लोक रामचंद्रन यांना चीनच्या अव्वल जोडीस झुंजवल्याचे समाधान लाभले. मेघना जक्कापुडी - पूर्विषा एस. राम सातव्या मानांकित जोडीविरुद्ध २३ मिनिटांतच पराजित झाल्या.

Web Title: quarter-finals of the Asian Badminton tournament,