माद्रिद स्पर्धेत क्विटोवा विजेती

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

चेक प्रजासत्ताकच्या दहाव्या मानांकित पेट्रा क्विटोवा हिने माद्रिद टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत झालेल्या मॅरेथॉन लढतीत पेट्राने नेदरलॅंड्‌सच्या किकी बेर्टेन्स हिचा 7-6(8-6), 4-6, 6-3 असा पराभव केला.
 

माद्रिद - चेक प्रजासत्ताकच्या दहाव्या मानांकित पेट्रा क्विटोवा हिने माद्रिद टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत झालेल्या मॅरेथॉन लढतीत पेट्राने नेदरलॅंड्‌सच्या किकी बेर्टेन्स हिचा 7-6(8-6), 4-6, 6-3 असा पराभव केला.

क्विटोवाने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली. यापूर्वी 2011 आणि 2015 मध्ये तिने ही स्पर्धा जिंकली होती. तीन वेळा ही स्पर्धा जिंकणारी क्विटोवा पहिली टेनिसपटू ठरली आहे. या वर्षीच्या मोसमातील तिचे हे चौथे विजेतेपद ठरले. या वर्षी तिने सेंट पिटर्सबर्ग, दोहा आणि प्राग ओपन या स्पर्धा जिंकल्या आहेत. 

Web Title: Quitova winner in Madrid championship