संघातील स्थानही पक्क नाही तरीही यानं घेतल्या दशकात सर्वाधिक विकेट्स

वृत्तसंस्था
Thursday, 26 December 2019

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 300 विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. वर्षभर कसोटी संघाबाहेर राहिल्यावर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोरदार पुनरागमन केले. या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याने सात बळी घेतले. सात बळी घेण्याची ही त्याची पाचवी वेळ होती. 

नवी दिल्ली : भारताचा फिरकीपटू आर अश्विनने यंदाच्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने यंदाच्या दशकात सर्वाधिक 564 बळी घेतले आहेत. 

याविक्रमासह त्याने इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनाही मागे टाकले आहे. अश्विनने 2011मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर त्याने नेहमीच वर्चस्व राखले आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 300 विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. वर्षभर कसोटी संघाबाहेर राहिल्यावर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोरदार पुनरागमन केले. या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याने सात बळी घेतले. सात बळी घेण्याची ही त्याची पाचवी वेळ होती. 

Image result for R ashwin

नुकतेच क्रिकेटचे बायबल म्हणून समजल्या जाणाऱ्या विस्डेनने निवडलेल्या दशकातील सर्वोत्तम संघातही भारताचा कर्णधार विराट कोहलीसह फक्त अश्विला स्थान मिळाले आहे. 

पदार्पणात पटकाविला मालिकावीराचा पुरस्कार 
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच पाच विकेट घेण्याचा विक्रम करणारा तो भारताचा केवळ सातवा गोलंदाज ठरला. त्याने त्या मालिकेत दोन वेळा पाच विकेट घेतल्या तसेच एक शतकही झळकाविले. त्या मालिकेत त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दशकातील सर्वाधिक बळी 
1. आर अश्विन (भारत) : 564
2. जेम्स अॅंडरसन (इंग्लंड) : 535
3. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) : 525
4. टीम साऊदी (न्यूझीलंड) : 472
5. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) : 458 

अमेझिंग अश्विन
-कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 50, 100, 150, 200, 250, 300 आणि 350 बळी घेणारा भारतीय
-2014मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित
-2016मध्ये आयसीसी सर्वोत्तम खेळाडू आणि आयसीसी सर्वोत्तम कसोटी खेळाडू या पुरस्काराने सन्मानित 

अश्विनचे कष्ट दुर्लक्षित : गांगुली
यंदाच्या दशकात सर्वाधिक बळी घेण्याचा पराक्रम केल्याबद्दल भारतीय नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अश्विनचे ट्विटरवरुन कौतुक केले आहे. मात्र, त्याचवेळी त्याच्या कष्टांकडे आणि कामगिरीकडे कधीकधी दुर्लक्ष केले जाते असेही म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R Ashwin finishes with most international wickets this decade