Australia Open: राफा इतिहास रचण्यापासून दोन पावले दूर

Rafael Nadal defeat Denis Shapovalov in Australian Open reached in semi final
Rafael Nadal defeat Denis Shapovalov in Australian Open reached in semi finalesakal

मेलबर्न : तब्बल २० वेळा ग्रँड स्लँम जिंकणाऱ्या राफेल नदालने (Rafael Nadal) ऑस्ट्रेलियन ओपनच्या (Australian Open 2022) उपांत्य पूर्व फेरीत कॅनडाच्या डेनिस शापोव्हालोव्हचा (Denis Shapovalov) कडवा प्रतिकार मोडून काढला. चार तास आठ मिनिटे चाललेल्या या लढतीत नदालने डॅनिसचा ६-३, ६-४, ४-६, ३-६, ६-३ अशा सेटमध्ये पराभव केला. याचबरोबर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत (semi-final) धडक मारली. नदाल आता २१ व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदापासून दोन पावलेच दूर आहे. जर नदालने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली तर तो २१ ग्रँड स्लॅम जिंकणारा इतिहासातील पहिला टेनिसपटू ठरले.

Rafael Nadal defeat Denis Shapovalov in Australian Open reached in semi final
धोनीच्या Lesson No. 7 जाहिरातीचं सेहवाग, समंथानेही केलं कौतुक

राफेल नदाल पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी खेळणाऱ्या डेनिस शापोव्हालोव्ह विरूद्ध सुरूवातीपासूनच आश्वासक वाटत होता. त्याने पहिला सेट ६-३ असा जिंकत धडाक्यात सुरूवात देखील केली. त्यानंतर ३ -३ अशा बरोबरीत असलेला दुसरा सेट राफेल नदालने ६ - ४ असा जिंकत सामन्यावरील आपली पकड आणखी मजबूत केली. आता राफेल नदाल उपांत्य फेरी गाठण्यापासून एक सेट दूर होता.

मात्र कॅनडाच्या डेनिसने झुंजार वृत्ती दाखवत तिसऱ्या सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेतली. पिछाडीवर पडेल्या नदालला या सेटमध्ये फारशी संधी न देता डेनिसने हा सेट ६-४ असा जिंकत नदालची विजयाची प्रतिक्षा अजून लांबवली. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये देखील डेनिसने नदालला कडवी झुंज देत सेट ६ - ३ असा जिंकला. त्यामुळे नदालच्या पारड्यातील सामना आता समसमान पातळीव आला होता.

Rafael Nadal defeat Denis Shapovalov in Australian Open reached in semi final
Video: 'सौरभ गांगुलीने कुठे वर्ल्डकप जिंकलाय म्हणून काय तो...'

मात्र अनुभवी राफेल नदालने पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये पहिल्यापासूनच पकत मिळवत आपले कसब पणाला लावले. त्याने हा सेट ६-३ अशा फरकाने जिंकत आपले उपांत्य फेरीतील तिकिट निश्चित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com