रॅफेल नदालचे ११वे फ्रेंच विजेतेपद

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

पॅरिस - क्‍ले कोर्टवरील ‘सम्राट’हे बिरुद पुन्हा एकदा सत्यात उतरवत स्पेनच्या रॅफेल नदालने रविवारी अकराव्यांदा फ्रेंच टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. नदालने अंतिम फेरीत ऑस्ट्रियाच्या सातव्या मानांकित डॉमिनिक थिमचा ६-४, ६-३, ६-२ असा सहज पराभव केला. 

नदालचे कारकिर्दीमधील हे १७वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. विशेष म्हणजे नदालने ११व्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना सर्व लढती जिंकल्या. 

क्‍ले कोर्टवर नदालला कोणीच आव्हानवीर नव्हता. मात्र, याच कोर्टवर त्याला केवळ थिमकडूनच पराभव पत्करावा लागला होता. या वेळी मात्र थिम नदालला आव्हान देऊ शकला नाही. थिम प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचला होता. त्याच्याकडून सर्वोत्तम खेळाची अपेक्षा होती. मात्र, नदालच्या आक्रमकतेसमोर त्याचा फिका पडला. पहिल्या सेटमध्ये त्याने चौथ्या आणि सहाव्या गेमला ब्रेक पॉइंट वाचवले, पण या पलीकडे त्याला काहीच समाधान मिळाले नाही. 

तिसऱ्या सेटमध्ये चौथ्या गेमला बोटाच्या दुखापतीने उपचारासाठी थांबावे लागले. या दुखापतीकडे दुर्लक्ष करत त्याने विजेतेपद मिळविले. या सेटमध्ये  थिमने नदालला मॅच पॉइंटसाठी पाच वेळा झुंजवले.

माझ्या भावना व्यक्त करु शकत नाही. येथे अकरावेळा जिंकेन असे स्वप्नातही वाटले नव्हते. ही कामगिरी नक्कीच कठीण होती. मात्र, आज ती सत्यात उतरली आहे.
- रॅफेल नदाल

Web Title: Rafael Nadal wins French Open final