नदालची अंतिम फेरीत धडक

वृत्तसंस्था
रविवार, 22 एप्रिल 2018

माँटे कार्लो - स्पेनच्या रॅफेल नदाल याने माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याने बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमीत्रोवला ६-४, ६-१ असे हरविले.

नदालने क्‍ले कोर्टवर सलग ३४वा विजय नोंदविला. कारकिर्दीत १२व्या वेळी त्याने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. ही स्पर्धा त्याने दहा वेळा जिंकली आहे. सहाव्यांदा त्याने अंतिम फेरी गाठताना एकही सेट गमावला नाही. चौथ्या मानांकित ग्रिगॉरविरुद्ध त्याला बॅकहॅंडचे फटके मारताना पुरेसे सातत्य राखता आले नाही. ग्रिगॉरला त्याने १२ सामन्यांत ११व्या वेळी हरविले.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत नदारलच्या कंबरेला दुखापत झाली. त्यामुळे त्याला ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर ही त्याची मोसमातील दुसरीच स्पर्धा आहे.

क्‍ले कोर्ट सम्राट
नदालने क्‍ले कोर्टवर सलग ३४ सेट जंकले आहेत. यातील एकही सेट ६-४ अशा स्कोअरच्या पलीकडे म्हणजे ७-५ किंवा टायब्रेकपर्यंत लांबलेला नाही.

Web Title: rafel-nadal final round