जपान गोल्फ स्पर्धेत राहील गांगजी विजेता

वृत्तसंस्था
सोमवार, 23 एप्रिल 2018

टोकियो - भारताचा अनुभवी गोल्फपटू राहील गांगजी याने जपानमधील पॅनासोनिक ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले. तब्बल चौदा वर्षांनी त्याने आशियाई मालिकेतील विजेतेपद पटकाविले. राहीलने चार दिवसांत २७० दोषांकासह ही कामगिरी करताना विजेतेपदाचे १५ कोटी येनचे (चौदा लाख डॉलर) पारितोषिक पटकावले. अखेरच्या दिवसाच्या सुरवातीस तो संयुक्त दुसरा होता. चमकदार सुरवात करीत त्याने आघाडी घेत ती टिकवत त्याने विजेतेपदाला गवसणी घातली.

Web Title: rahil Gangjee winner