INDvsWI : 6.8 फूट उंच अन् 150 किलोचा पैलवान भिडणार भारतीयांना

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत विंडीजच्या संघात चक्क 6.8 उंच आणि 150 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. रहकीम कॉर्नवॉल असे त्याचे नाव. 

गयाना : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत विंडीजच्या संघात चक्क 6.8 उंच आणि 150 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. रहकीम कॉर्नवॉल असे त्याचे नाव. 

रहकीमला अखेर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळत आहे. त्याची पहिली झलक तुम्ही नक्कीच फार काळ लक्षात ठेवाल. त्याची उंची 6.8 फूट आहे तर त्याचे वजन 150 किलोपेक्षा जास्त आहे. तो नक्कीच सर्वांत तंदुरुस्त खेळाडू नाही मात्र, त्याच्या अफाट ताकदीमुळे तो लांबच लांब फटके खेचतो आणि हीच त्याची खरी ताकद आहे. 

Image result for Rahkeem Cornwall

रहकीम हा मूळचा अँटिग्वाचा खेळाडू आहे.  तो उजव्या हाताने फलंदाजी आणि स्पिन गोलंदाजी करतो. त्याला क्रिकेटमधील मानवी पर्वत या टोपणनावानेही ओळखले जाते.

Image result for Rahkeem Cornwall

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ५ वर्षांपूर्वी पदार्पण केले. 2016 मध्ये भारत दोऱ्यावर विंडीजच्या अध्यक्षीय संघाकडून खेळताना त्याने एका डावात 5 बळी टिपले होते. त्याने आतापर्यंत 1 शतक आणि 13 अर्धशतके ठोकली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahkeem Cornwall is more than 6 feet and also weighs more than 150 kgs gets a place WI test squad