रहमत शाह ठरला अफगाणिस्तानकडून कसोटी शतक ठोकणारा पहिला खेळाडू

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात रहमत शाह याने शानदान शतक ठोकले आहे. याचसह कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. 

छट्टोग्राम : अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात रहमत शाह याने शानदान शतक ठोकले आहे. याचसह कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. 

Image

इब्राहीम झारदान आणि एहसानउल्हा हे दोघे सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यावर रहमतने डाव सावरण्याची सगळी जबाबदारी स्वत:वर घेतली.

रहमतने 187 चेंडूंमध्ये 102 धावा केल्या. यामध्ये त्याने 10 चौकार आणि दोन षटकार मारले. त्याने 54.54 स्ट्राईक रेटने धावा केल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahmat Shah becomes the first ever Test centurion from Afghanistan