कुस्तीत मराठमोळ्या राहुल आवारेला सुवर्णपदक

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला एक मराठमोळ्या कुस्तीपटू राहुल आवारे याने सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. राहुलने फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

राहुलने आज (गुरुवार) सकाळी सलग विजय मिऴवीत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. अंतिम फेरीत त्याची झुंज कॅनडाच्या स्टीफन ताकाहाशी याच्याशी होती. त्याने सुरवातीलाच दोन गुण मिळवीत आघाडी घेतली. पण, ताकाहाशीने राहुलला झुंज देत चार गुण मिळविले. मात्र, तरीही राहुलने हार न मानता सामन्यात पुन्हा मुसंडी मारत ताकाहाशीला संधीच दिली नाही. त्याने अखेर 15-6 अशी मात केली. 

भारताने आतापर्यंत 27 पदके मिळविली असून, यामध्ये 13 सुवर्णपदकांचा समावेश आहेत. राहुलच्या विजयानंतर त्याचे प्रशिक्षक काका पवार यांनी आनंद व्यक्त केला.

Web Title: Rahul Aware wins Gold for India in CWG 2018