"पीकेएल'मध्ये राहुल एकमेव महाराष्ट्रीयन

पीटीआय
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - कुस्ती लीगच्या दुसऱ्या मोसमासाठी राहुल आवारे या एकमेव महाराष्ट्रीय मल्लाला संधी मिळाली असून, त्याला मुंबई संघाने 31 लाख रुपयांना खरेदी केले. दुसऱ्या मोसमातील लिलावात भारताकडून बजरंग पुनिया (38 लाख) आणि परदेशी खेळाडूत व्लादिमिर खिनश्‍चेगाशिविली (48) लाख यांना सर्वाधिक रक्कम मिळाली.

दुसऱ्या मोसमाच्या लिलावासाठी भारताकडून साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि गीता फोगट असे प्रथितयश खेळाडू उपलब्ध होते. यामध्ये सर्वाधिक 48 लाख रुपये जॉर्जियाचा रिओ ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता खिनश्‍चेगाशिविली याला मिळाले. त्याला अभिनेता धर्मेंद्रच्या पंजाब संघाने करारबद्ध केले. बजरंग पुनियाला दिल्लीने 38 लाख रुपयात खरेदी केले. ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साक्षी मलिक या वेळी दिल्लीची खेळाडू ठरली. तिला 30 लाख रुपये दिले.

असे असतील संघ (कंसात खेळाडूस मिळालेली रक्कम रुपयांत)

पंजाब: व्लादिमिर खिनश्‍चेगाशिविली (48 लाख), टोगरुल असगारोव (35 लाख), जितेंद्र (11.5 लाख), आडुनायो अडेकुरोये (32 लाख), वासिलिसा मार्झालियु (20 लाख), मंजू कुमारी (20 लाख)

हरियाना : संदीप तोमर (31 लाख), मगोमेड कुबाईनालिएव (47 लाख), अब्दुसालम गाडिसोव (20 लाख), सोफिया मॅटसन (41.5 लाख), मारवा अमरी (25 लाख)

मुंबई : प्रीतम (7.75 लाख), राहुल आवारे (31 लाख), जब्राईल हासनोव (43 लाख), एरिका विएबे (43 लाख)

दिल्ली : अर्डेनेबाट बेखबायर (16 लाख), बजंरग पुनिया (38 लाख), सत्यव्रत कडियान (18 लाख), मारिया स्टॅडनिक (47 लाख), साक्षी मलिक (30 लाख), संगीता फोगट (5 लाख)

जयपूर : राहुल मान (9 लाख), एलिझबार ओडिकाझे (25.5 लाख), रितु फोगट (36 लाख), पूजा धांडा (7 लाख)

उत्तर प्रदेश : अमित दहिया (14 लाख), अमित धनकार (32 लाख), मौसम खत्री (15.75 लाख), गीता फोगट (16 लाख), मारिया मामाशुक (29 लाख)

Web Title: Rahul only in Maharashtra