ऑलिंपिक पदकाच्या आशा उंचावल्या 

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २६ सुवर्णपदकांसह ६६ पदके जिंकलेल्या भारतीय क्रीडापटूंचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी कौतुक केले. त्यांनी या यशामुळे ऑलिंपिक पदकाच्या आशा उंचावल्या असल्याचे नमूद केले. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक क्रमवारीत भारताने तिसरे स्थान मिळवले. याकडे लक्ष वेधत राठोड म्हणाले, भारतीय क्रीडापटूंनी यशासाठी सर्व कस पणास लावला. त्यांची जिगर, यश पाहून देशवासीयांना अभिमान वाटला आहे. या स्पर्धेत आपण ताकद असलेल्या क्रीडा प्रकारात हुकूमत राखलीच त्याचबरोबर आपण ताकद न समजलेल्या खेळातही चांगली पदके जिंकली. 

खेलो इंडियात प्रभावी कामगिरी केलेल्या मनू भाकर, अनिष भानवाला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, याचा क्रीडामंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. आपण खेळातील प्रगतीसाठी व्यावसायिकता आणत आहोत. आपल्या युवकांत यश मिळवण्याची क्षमता आहे. आपण २०२४ आणि २०२८ च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत नक्कीच चांगली पदके जिंकू शकतो, असेही राठोड यांनी नमूद केले. 

राज्य सरकारचीही साथ हवी 
केंद्र सरकार खेळाच्या प्रगतीसाठी साह्य करीत आहेच, त्याचबरोबर राज्य सरकारनेही खेळासाठी निधी उपलब्ध करून द्यायला हवा. खेळ हा राज्यांचा प्रामुख्याने विषय आहे. ते जितकी साथ देतील, तेवढे यशस्वी खेळाडू त्या राज्यातून पुढे येतील, असे राठोड यांनी सांगितले. 

क्रीडा ताकद होण्याच्या दिशेने - बत्रा 
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे तिसरे स्थान हे प्रगती सुरू असल्याचे द्योतक आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रात ताकद होण्याच्या दिशेने योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा प्रत्येक क्रीडापटू कौतुकास पात्र आहे. त्यांच्या कठोर परिश्रमास फळ मिळाले. त्यांनीच भारताची खेळातील ताकद वाढत असल्याचे दाखवून दिले आहे. 

बहुतेक महिला खेळाडूंनी पारंपरिक मार्ग सोडला. त्यांनी देशातील असंख्य युवतींना प्रगतीची प्रेरणा दिली आहे, असे बत्रा यांनी म्हटले आहे. 

Web Title: Raising the hopes of an Olympic medal