राजस्थान रॉयल्सचा दुसरा विजय

राजस्थान रॉयल्सचा दुसरा विजय

बंगळूर - घरच्या मैदानावर खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ रविवारी आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनने केलेल्या फटकेबाजीमुळे घायाळ झाला. राजस्थानने बंगळूरचा १९ धावांनी पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. 

राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनची ४५ चेंडूंतील नाबाद ९५ धावांची खेळीच त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. निर्धारित २० षटकांत राजस्थानने ४ बाद २१७ धावा केल्या. त्यानंतर धमाकेदार प्रारंभानंतरही बंगळूरचा डाव ६ बाद १९८ असा मर्यादित राहिला. 

नाणेफेक जिंकल्यापासून बंगळूरचे निर्णय चुकत गेले. राजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणे आणि शॉर्ट यांनी आक्रमक सुरवात केली; मात्र फटकेबाजीच्या नादात दोघे बाद झाले. अर्थात त्याचा काही फरक पडला नाही. संजूने प्रथम बेन स्टोक्‍स आणि नंतर जोस बटलर या इंग्लंडच्या खेळाडूंना हाताशी धरत संघाचे आव्हान मजबूत केले. तुफानी फटकेबाजी करत संजूने ४५ चेंडूंत २ चौकार १० षटकारांसह ९२ धावा केल्या. 

आव्हानाचा पाठलाग करताना बंगळूरसाठी ब्रेंडन मॅकलम पुन्हा अपयशी ठरला; पण त्यानंतर डी कॉक आणि कर्णधार कोहली यांनी दहाच्या धावगतीने डाव पुढे नेला. ही जोडी जमवली होती; मात्र २३ धावांत डी कॉक, कोहली आणि डिव्हिलर्स हे बंगळूरचे प्रमुख फलंदाज बाद झाले. त्यानंतर चेंडू आणि आवश्‍यक धावगतीचे समीकरण वाढत राहिले आणि बंगळूर विजयापासून दूरच राहिले.

संक्षिप्त धावफलक 
राजस्थान २० षटकांत ४ बाद २१७ (संजू सॅमसन नाबाद ९२, अजिंक्‍य रहाणे ३६, बेन स्टोक्‍स २७, ख्रिस वोक्‍स २-४७, युजवेंद्र चहल २-२२) वि.वि. बंगळूर ६ बाद १९८ (विराट  कोहली ५७, मनदीप सिंग नाबाद ४७, वॉशिंग्टन सुंदर ३५, डी कॉकक २६, श्रेयस गोपाळ २-२२)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com