Video : बटलरचा भन्नाट कॅच; राजस्थानने केली थेट स्पायडर मॅनशीच तुलना

Jos Buttler
Jos Buttleresakal

अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरु असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटी सामना आजपासून सुरु झाला. अ‍ॅडलेडवरील हा गुलाबी चेंडूवर खेळवला डे - नाईट कसोटी सामना असणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने (England Cricket Team) ऑस्ट्रेलियाला 4 धावांवर पहिला धक्का दिला. स्टुअर्ट ब्रॉडने यष्टीरक्षक जोस बटलर (Jos Buttler) करुवी मार्कस हॅरिसला (Marcus Harris) झेलबाद करत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर माघारी धाडला.

Jos Buttler
विराट कोहलीने केले 'परफेक्ट डॅड' वाले काम

मार्कस हॅरिसची विकेट जरी स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) घेतली असली तरी चर्चा मात्र जोस बटलरचीच होत आहे. स्टुअर्ट ब्रॉडने आठव्या षटकातील तिसरा चेंडू टाकला. अखूड टप्प्याचा हा चेंडू मार्कस हॅरिसने पूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र लेग साईडला जाणारा हा चेंडू डावखुऱ्या हॅरिसच्या (Marcus Harris) बॅटची कडा घेऊन गेला. हा चेंडू यष्टीरक्षक जोस बटलर (Jos Buttler) याच्यापासून दूर जात होता. मात्र बटलरने डाईव्ह मारत हा चेंडू पकला आणि हॅरिस बाद झाला.

Jos Buttler
Ashes | डेव्हिड वॉर्नरला पुन्हा दिली शतकाने हुलकावणी

ज्यावेळी जोस बटलरने (Jos Buttler) हे चेंडू पकडण्यासाठी डाईव्ह मारला त्यावेळी तो पूर्णपणे हवेत होता. हा कॅच पकडल्यानंतर इंग्लंडच्या सर्वच खेळाडूंनी जोस बटलरचे कौतुक केले. दरम्यान, जोस बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. राजस्थान रॉयल्सनेही बटलरच्या या कॅचचे कौतुक केले. त्यांनी या कॅचची तुलना थेट स्पायडर मॅनशीच केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com