Rajvardhan Hangargekar : पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राचा अष्टपैलू राजवर्धनचे CSK कडून IPL पदार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajvardhan Hangargekar IPL Debut

Rajvardhan Hangargekar : पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राचा अष्टपैलू राजवर्धनचे CSK कडून IPL पदार्पण

Rajvardhan Hangargekar IPL Debut : आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम लागू झाल्यामुळे दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार याची उत्सुकता होती. चेन्नई सुपर किंग्जने आपल्या प्लेईंग 11 मध्ये महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू, 20 वर्षाच्या राजवर्धन हंगरगेकरला आयपीएल पदार्पण करण्याची संधी दिली आहे.

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील पहिल्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने आपल्या संघात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला स्थान दिले. तर चेन्नई सुपर किंग्जकडून महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर आयपीएल पदार्पण करणार आहे. राजवर्धन हा 19 वर्षाखालील वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडू आहे. अवघ्या 20 व्या वर्षी त्याला धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली आहे.

राजवर्धन हंगरगेकरला गेल्या हंगामातच सीएसकेने आपल्या संघात समाविष्ट केले होते. मात्र त्याला अंतिम 11 च्या संघात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. असे असले तरी राजवर्धन हा सीएसकेच्या कॅम्पमध्ये चांगलाच घाम गाळत होता. त्याला सरावावेळी धोनीचे देखील मार्गदर्शन लाभत राहिले. राजवर्धन हा वेगवान गोलंदाज असून त्याच्याकडे पॉवर हिटिंग करण्याची क्षमता देखील आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??