World Cup 2019 : रोहित आणि विराट खेळायला गेले होते की हनिमूनला? 

वृत्तसंस्था
Monday, 15 July 2019

वर्ल्डकप स्पर्धेत मँचेस्टर येथे रंगलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव झाला होता. या पराभवासह भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. या सामन्यात रोहित, राहुल आणि कर्णधार कोहली प्रत्येकी केवळ एका धावेवर तंबूत दाखल झाले होते. भारताच्या या निराशाजनक खेळीवर अभिनेत्री राखी सावंतने जोरदार टीका केली आहे.

वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकप स्पर्धेत मँचेस्टर येथे रंगलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव झाला होता. या पराभवासह भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. या सामन्यात रोहित, राहुल आणि कर्णधार कोहली प्रत्येकी केवळ एका धावेवर तंबूत दाखल झाले होते. भारताच्या या निराशाजनक खेळीवर अभिनेत्री राखी सावंतने जोरदार टीका केली आहे.

राखी सावंतने म्हटले आहे की, तुम्ही वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेला होतात की हनिमूनसाठी, असा प्रश्न तिने कर्णधार विराट कोहली व सलामीवीर रोहित शर्माला विचारला आहे. खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासोबत का गेल्या आहेत. हे काही हनिमून नाही. वर्ल्ड कप चार वर्षात एकदाच येतो. हा चषक आपला झाला असता. वर्ल्ड कपनंतर तुम्ही मनाला वाटेल तिथे पत्नीसोबत फिरू शकता. पण आता खेळावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं होतं, अशा शब्दांत राखीने राग व्यक्त केला आहे.

इतकंच नव्हे तर हे वर्ल्ड कपपेक्षा हनिमून कप असल्यासारखं वाटतंय, अशीही टीका तिने केली. सध्या सोशल मीडियावर राखीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakhi Sawant Accuses Virat Kohli And Rohit Sharma Of Using The World Cup As Honeymoon