VIDEO : रमीझ राजांनी केलेल्या इम्रान खानच्या भविष्यवाणीचा व्हिडिओ व्हायरल

VIDEO : रमीझ राजांनी केलेल्या इम्रान खानच्या भविष्यवाणीचा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संचालक रमीझ राजाने (Ramiz Raja) पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय नाट्यादरम्यान, एक दोन वर्षापूर्वीचा आपला व्हिडिओ शेअर केला. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या 2019 च्याव्हिडिओत रमीझ राजा यांनी इम्रान खान (Imran Khan) यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. राजांनी इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून यशस्वी होतील असे ते म्हणाले होते. पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला होता त्यावेळी रमीझ राजा देखील त्या संघाचा भाग होता.

VIDEO : रमीझ राजांनी केलेल्या इम्रान खानच्या भविष्यवाणीचा व्हिडिओ व्हायरल
IPL 2022 : सीएसकेच्या पराभवाच्या हॅट्ट्रिकमागे ग्राऊंड स्टाफ 'केमिकल लोचा'

रमीझ राजा या व्हिडिओत (Ramiz Raja Video) म्हणतात की, 'तुम्ही महागाई, इतर मुद्यांबाबत देखील बोलू शकता मात्र माझे शब्द लक्षात ठेवा वास्तवात ही एक भविष्यवाणी आहे. इम्रान खान नक्की यशस्वी होतील. ते तुम्हाला सातत्याने चुकीचे ठरवलीतील. कारण त्यांचा उद्देश साफ आहे. ते खूप परिश्रम करतात. त्यांना चांगली बुद्धीमत्ता लाभली आहे.'

VIDEO : रमीझ राजांनी केलेल्या इम्रान खानच्या भविष्यवाणीचा व्हिडिओ व्हायरल
VIDEO : 'आल्यापासून तू माझ्यावर दबाव टाकतो आहेस'; बटलरची चहलविरूद्ध तक्रार

रमीझ राजा यांचे हे ट्विट ज्या दिवशी आले त्या दिवशी इम्रान खान यांनी त्यांच्याविरूद्धचा अविश्वास ठराव फेटाळून लावण्यात आला होता. संसदेचे उपसभापती कासिम सूरीने हा अविश्वास ठराव फेटाळून लावला. यानंतर विरोधी पक्षांनी एकच गोंधळ केला होता. मात्र या निर्णयामुळे इम्रान खान यांना पुन्हा 90 दिवस पंतप्रधानपदी राहण्याची संधी मिळाली आहे. यानंतर पाकिस्तानात निवडणुका लागण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com