Ramiz Raja Shoaib Akhtar : शोएब अख्तर पीसीबी चेअरमन... राजा म्हणाले आधी पदवी तर घे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramiz Raja Shoaib Akhtar Controversy

Ramiz Raja Shoaib Akhtar : शोएब अख्तर पीसीबी चेअरमन... राजा म्हणाले आधी पदवी तर घे

Ramiz Raja Shoaib Akhtar Controversy : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या आजी खेळाडू आणि माजी खेळाडू यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर सध्याचा कर्णधार बाबर आझम पासून माजी खेळाडू कामरान अकमल यांच्यावर चांगलीच टीका केली होती. त्याने क्रिकेटबरोबरच इंग्रजी देखील शिकणे खूप गरजेचे असल्याचे सांगितले. यावर आता पाकिस्तान क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी अख्तरवर टीका केली.

पाकिस्तानमधील स्थानिक चॅनल बीओएलशी बोलताना राजा म्हणाले की, 'शोएब अख्तर हा भ्रामक सुपरस्टार आहे. त्याला कामरान अकमलबाबत देखील अडचण होती. त्याला सर्वांनी एक ब्रँड व्हाव असं वाटत. मात्र सर्वात आधी त्यांनी चांगला व्यक्ती होणं गरजेचं आहे मग ब्रँड होता येईल.'

राजा पुढे म्हणाले की, 'आपले माजी खेळाडू आपल्या भ्रामक वक्तव्यांनी आपल्या खेळाडूंचे खच्चीकरण करत आहेत. हे असलं सगळं आपल्या शेजारी देशात होताना आपण पाहत नाही. तुम्ही कधीही सुनिल गावसकरांना राहुल द्रविडवर टीका करताना पाहिलं नसेल. हे फक्त पाकिस्तानात होतं जेथे माजी खेळाडू उतरांना त्यांचे काम व्यावसायिक पद्धतीने करू देत नाही.'

रमीझ राजांना शोएब अख्तरचे पीसीबी चेअरन होण्याचे स्वप्न आहे का असे विचारले असता त्यांनी अख्तरवर शेलक्या शब्दात चिमटा काढला. राजा म्हणाले, 'पीसीबी चेअरमन पदासाठी पात्र होण्याकरिता आधी त्याला पदवीधर व्हाव लागेल.'

(Sports Latest News)