रमीझ राजा पाकिस्तान क्रिकेटचे नवे 'वजीरे आलम'

एहसान मनी यांच्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सर्व सूत्रे रमीझ राजाच्या हाती येतील.
Ramiz Raja
Ramiz Raja File Photo

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर रमीझ राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket Board) अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी रमीझ राजा (Ramiz Raja) यांच्या नावाच्या शिफारशीला हिरवा कंदिल दिलाय. त्यामुळे एहसान मनी यांच्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची सर्व सूत्रे रमीझ राजाच्या हाती येतील. रमीझ राजा आणि एहसान मनी यांनी सोमवारीच पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली होती.

पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतल्यानंतर रमीझ राजा यांनी क्रिकबझशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांना माझ्या डोक्यातील प्लॅन सविस्तरपणे सांगितला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पदभार स्विकारला असून पाकिस्तान क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करेन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com