रणजीची बाद फेरी कोठे होणार?; BCCI च्या बैठकीत निर्णयाची शक्यता

साखळी फेरीचा टप्पा मार्च महिन्यापर्यंत खेळवण्यात आला. जून महिन्यात बाद फेरीच्या लढती खेळवण्यात येणार
Ranji Trophy holding BCCI takes a big decision
Ranji Trophy holding BCCI takes a big decisionsakal

मुंबई : कोरोनामुळे दोन वर्षे न होऊ शकलेली रणजी ही प्रतिष्ठेची स्पर्धा यंदा पार पडते आहे. साखळी फेरीचा टप्पा मार्च महिन्यापर्यंत खेळवण्यात आला. जून महिन्यात बाद फेरीच्या लढती खेळवण्यात येणार आहेत; पण भारतात जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. अशा परिस्थितीत बीसीसीआयसमोर या लढती कुठे खेळवायच्या, हा यक्षप्रश्‍न असणार आहे. बीसीसीआयच्या एपेक्स काऊन्सिलची बैठक २३ एप्रिलला होणार असून यामध्ये यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.(Ranji Trophy News)

भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये जून महिन्यात ९ (चेन्नई), १२ (बंगळूर), १४ (नागपूर), १७ (राजकोट), १९ (दिल्ली) या तारखांना पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. याच महिन्यात रणजी क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरी खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयला स्थळांची निश्‍चित्ती करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.(BCCI big decision)

भारत - द. आफ्रिका यांच्यातील दोन सामने दक्षिण भारतात होणार आहेत. रणजी स्पर्धेतील बाद फेरीच्या लढतीही तेथेच खेळवण्याची शक्यता आहे; पण प्रत्यक्षात बीसीसीआयला अभ्यास करून निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण पावसाच्या व्यत्ययामुळे लढती रद्द झाल्यास स्पर्धेचा शेवट कडू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या बैठकीत रिद्धिमान साहा प्रकरणावरही निकाल लावण्यात येण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com