83च्या विश्वकरंडकावर चित्रपट; कपिल देवच्या भूमिकेत रणवीर

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

धर्मशाला : भारताने पहिल्यांदा 1983 मध्ये विश्वकरंडक पटकाविला, आता याच घटनेला उजाळा देत भारतीय संघाच्या कामगिरीवर चित्रपट बनविण्यात येत असून, रणवीर सिंग कपिल देवची भूमिका करणार आहे.

धर्मशाला : भारताने पहिल्यांदा 1983 मध्ये विश्वकरंडक पटकाविला, आता याच घटनेला उजाळा देत भारतीय संघाच्या कामगिरीवर चित्रपट बनविण्यात येत असून, रणवीर सिंग कपिल देवची भूमिका करणार आहे. 

रणवीरने या चित्रपटाच्या शूटींगला धर्मशाला स्टेडियममध्ये सुरवात केली आहे. त्याने ट्विटरवर कपिल देव सोबतचे फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे. 'Becoming the Hurricane' असे कॅप्शन टाकत त्याने फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Becoming the Hurricane  #KapilDev #Legend #JourneyBegins @83thefilm @kabirkhankk 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

83 the film

 

रणवीरने या चित्रपटासाठी फेब्रुवारीपासूनच बलविंदरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली तयरीला सुरवात केली आहे. बलविंदरसिंग 1983च्या विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघात गोलंदाज होते. रणवीर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये दिवसाआड दोन तास सराव करत होता.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranveer Singh begins filming 83 in Dharamshala with Kapil Dev