सगळी औपचारिकता, रवी शास्त्रीच टीम इंडियाचे कोच

Ravi Shastri appointed as coach of Team India
Ravi Shastri appointed as coach of Team India

मुंबई : भारतीय संघाच्या बहुचर्चित मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांची पुढील दोन वर्षांसाठी फेरनियुक्ती करण्यात आली. कपिलदेव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या तीन सदस्यांच्या सल्लागार समितीने शास्त्रींच्या नावावर मोहोर उमटवली. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेबरोबरच शास्त्री यांची अगोदरची मुदत संपल्यामुळे पुढील प्रशिक्षक कोण? याची उत्सुकता ताणली जात होती. चर्चाही होत होती. गेल्या तीन वर्षांत शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने केलेली प्रगती त्यांच्या पथ्यावर पडली. 

शास्त्रींसह माईक हेसन, टॉम मुडी, फिल सिमन्स, लालचंद राजपूत आणि रॉबिनसिंग मुख्य प्रशिक्षकपदासाठी शर्यतीत होते, पण आज सकाळी मुलाखतीची प्रक्रिया सुरू होण्याअगोदर वेस्ट इंडीजच्या सिमन्स यांनी माघार घेतली. 

"टाइम झोन'मुळे विलंब 
आज सकाळपासून मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली. माईक हेसन, लालचंद राजपूत आणि रॉबिनसिंग प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित होते. आम्ही प्रत्येकाला अर्धा तास सादरीकरणासाठी दिला. त्यानंतर टॉम मुडी (ऑस्ट्रेलिया) आणि शास्त्री (भारत) दोन वेगेगळ्या टाइम झोनमध्ये असल्यामुळे आम्हाला दुपारी काही वेळ थांबावे लागले. या दोघांची स्काइपवरून मुलाखत झाली, असे कपिलदेव यांनी सांगितले. 

कडवी चुरस 
शास्त्री, टॉम मुडी आणि माईक हेसन यांच्यात कडवी चुरस झाली. या तिघांनीही पुढील दोन वर्षांसाठी भारतीय संघाची कशी प्रगती करता येईल, याचे सादरीकरण दिले. या तिघांमध्ये फारसा फरक नव्हता. अखेर शास्त्री यांनी गेल्या तीन वर्षांत केलेली कामगिरी त्यांच्या पथ्यावर पडली, असे कपिलदेव म्हणाले. 

अशी होती प्रक्रिया 
आम्हा तिघांना पाच मुद्द्यांची प्रश्‍नावली दिली होती. या इच्छुकांशी बोलून आम्ही प्रत्येक जण त्याचे गुणांकन करत होतो. पण कोणी किती गुण दिले यावर आम्ही चर्चा करत नव्हतो. मुलाखती झाल्यानंतर आम्ही दिलेल्या गुणांची बेरीज केली आणि त्यातून शास्त्री सरस ठरले, असे कपिलदेव यांनी सांगितले. 

पूर्ण पारदर्शकता 
आम्ही सर्व इच्छुकांना पूर्ण संधी दिली. त्यांचे प्रत्येक सादरीकडून आम्ही बारकाईने पाहिले. ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शक होती. आता त्यांना किती मानधन देणार याबाबत बीसीसीआयच तुम्हाला कळवेन, असे सांगून कपिलदेव यांनी अर्थकारणाचा मुद्दा बीसीसीआयच्या कोर्टात टाकला. 

तिसरी "इनिंग' 
रवी शास्त्री 2015 मध्ये संघ व्यवस्थापक होते. त्यानंतर 2017 मध्ये मुख्य प्रशिक्षक झाले होते. पदे वेगवेगळी असली तरी ही त्यांची तिसरी टर्म आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com