WTC Final MS Dhoni Test Retirement : धोनी निवृत्तीतून बाहेर येणार, WTC फायनल खेळणार... काय म्हणाले शास्त्री? | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC Final MS Dhoni Test Retirement

WTC Final MS Dhoni Test Retirement : धोनी निवृत्तीतून बाहेर येणार, WTC फायनल खेळणार... काय म्हणाले शास्त्री?

WTC Final MS Dhoni Test Retirement : बीसीसीआयने जून महिन्यात होणाऱ्या WTC Final साठीचा भारताचा संघ नुकाताच जाहीर केला. या संघात दुखापतीतून सावरत असलेला ऋषभ पंतचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्या ऐवजी संघात केसी भरत आणि केएल राहुल यांचा विकेटकिपर म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, WTC Final साठी निवडण्यात आलेल्या भारतीय कसोटी संघाबाबत क्रिकइन्फोवर चर्चा सुरू होती. यावेळी अँकरने रवी शास्त्रींना एकमेव कसोटी सामन्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी कसोटी निवृत्तीतून बाहेर येईल का असा भन्नाट प्रश्न विचारला.

यावर रवी शास्त्री म्हणाले की, 'धोनीने देशातील युवा विकेटकिपर्सना आपल्या स्टाईलने विकेटकिपिंग कशी करायची असते हे दाखवून दिले आहे.' शास्त्रींना धोनी एका कसोटीसाठी निवृत्तीमधून बाहेर येऊ शकतो का असे गांभिऱ्याने विचारल्यानंतर शास्त्री म्हणाले की,

'नाही! एमएसने एकदा ठरवलं की ठरवलं. त्याने अजून वर्ष दीडवर्ष तरी कसोटी क्रिकेट आरामात खेळू शकत असताना निवृत्ती जाहीर केली. आपल्या देशात आकडेवारीला खूप महत्व आहे. जर तो आकडेवारीला महत्व देत असता तर तो नक्कीच 100 कसोटी खेळण्यासाठी इच्छुक असता.'

'प्रेक्षकांनी तुडूंब भरलेल्या स्टेडियममध्ये, चांगला सोहळा आयोजित करून, उत्तम सादरीकरण, प्रेक्षकांना अभिवादन करत फेरी मारत सर्वांना बाय बाय म्हंटलं असतं. मात्र हे सर्व त्याला नको होतं. नवीन माणूस आहे. मी चाललो आता त्याच्याकडे सूत्र सोपवा अशा प्रवृत्तीचा माणूस आहे.'

(Sports Latest News)