संघात स्थान मिळवायचंय? आता शास्त्री मास्तरांचा सर्वांत कठीण पेपर द्यावा लागणार

Ravi Shastri to increase yo yo test mark limits to 17
Ravi Shastri to increase yo yo test mark limits to 17

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती झाल्यावर आता त्यांनी संघाच्या तंदुरुस्तीवर जास्त लक्ष देण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच त्यांनी आता यो-यो चाचणीतील गुणांची मर्यादा वाढविली आहे. त्यामुळे आता भारतीय संघात स्थान मिळवायचे असल्यास शास्त्रींनी सेट केलेला या कठीण पेपरचा अडथळा पार करणे गरजेचे आहे. 

यापूर्वी भारतीय संघात स्थान मिळवायचे म्हणजे खेळाडूला यो-यो चाचणीमध्ये 16.1 गुण मिळवावे लागत होते. मात्र, आता नवीन नियमांनुसार प्रत्येक खेळाडूला 17 गुण मिळवणे बंधनकारक असणार आहे. 

बंगळुरू टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार यो-यो टेस्टमधील गुणांची मर्यादा 17 पर्यंत वाढवण्याचा विचार शास्त्री करत आहेत. 
सगळ्यांशी चर्चा करुन शास्त्री याबाबत थोड्याच दिवसात निर्णय घेतील. 

या महिन्यात 15 तारखेपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या मालिकेसाठी ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघ निवडताना प्रत्येक खेळाडूला या टेस्टमध्ये शास्त्रींचे निकष पूर्ण करावे लागतील.

नुकत्याच एक मुलाखतीत एकूणच सातत्य राखण्यावर आणि दुसरी फळी भक्कम करण्याचे आपले उद्दिष्ट असेल असे शास्त्रींनी सांगितले. ते म्हणाले,"क्रिकेटचा कार्यक्रम व्यग्र असल्यामुळे सातत्य आणि तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. त्याचवेळी खेळाडूंवर अधिक ताण पडणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. त्यामुळे दुसरी फळी भक्कम असणे महत्वाचे आहे. याचा क्रिकेटच्या तिनही प्रकारासाठी फायदा होणार आहे.'' 

काय असते ही यो-यो चाचणी : 
यो-यो चाचणीमध्ये खेळाडूंची सहनशक्की पाहिली जाते. यापूर्वी या चाचणीमध्ये अंबाती रायुडू, महंमद शमी, संजू सॅमसन यांच्यासारखे खेळाडू एकदा नापास झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com