रवी शास्त्री बनले 'डीजे'; विराट, धवनचा डान्स

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जानेवारी 2018

भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी यानंतर रवी शास्त्री यांना 'DJ वाले बाबू' म्हणण्यास सुरुवात केली. काही युजर्सनी रवी शास्त्री यांना 5 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत चांगले प्रदर्शन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चक्क डीजेची भूमिका निभावली. तर, कर्णधार विराट कोहली आणि शिकर धवन यांनी रस्त्यावरच भांगडा नृत्य केले.

भारतीय क्रिकेटपटूंनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघ 56 दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेत भारत तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 5 जानेवारीपासून होणार आहे. दरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एक फोटो भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आहे. रवी शास्त्री यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दक्षिण अफ्रिकेतील एका पबमधील फोटो अपलोड केला असून, त्यामध्ये ते डीजेच्या भूमिकेत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी यानंतर रवी शास्त्री यांना 'DJ वाले बाबू' म्हणण्यास सुरुवात केली. काही युजर्सनी रवी शास्त्री यांना 5 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत चांगले प्रदर्शन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर, दुसरीकडे विराट कोहली आणि शिखर धवन यांनी केपटाऊनमधील रस्त्यावर भांगडा नृत्य केले. या दोघांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravi Shastri Turns DJ Welcomes 2018 in Style