प्रशिक्षकपद हवयं? शास्त्रींना पुन्हा अर्ज करावा लागणार

वृत्तसंस्था
Tuesday, 16 July 2019

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांना वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत जीवदान आहे. विंडीज दौऱ्यानंतर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमध्ये बदल होणार हे निश्‍चित आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांना वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत जीवदान आहे. विंडीज दौऱ्यानंतर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमध्ये बदल होणार हे निश्‍चित आहे.

या सर्वांना 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. येत्या एक दोन दिवसात "बीसीसीआय'च्या संकेतस्थळावर या सर्व पदांसाठीची जाहिरात केली जाईल. सपोर्ट स्टाफसह संघ व्यवस्थापकपदासाठी देखील नव्याने अर्ज करावा लागणार आहे, असे "बीसीसीआय'च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravi Shastri will have to apply once again for the post of coach of Indian Cricket Team