IPL 2020 : नाही नाही म्हणत अखेर अश्विनची पंजाबला सोडचिठ्ठी; खेळणार 'या' संघातून

वृत्तसंस्था
Wednesday, 6 November 2019

''हो अश्विन दिल्ली कॅपिटल्सला जॉईन करत आहे. आधी हा करार होऊ शकला नाही कारण तेव्हा पंजाबला ट्रेडमध्ये कोणते दोन खेळाडू उतरवावे हे कळत नव्हते. मात्र, आता त्यांनी निर्णय घेतला आहे आणि हा करार 99 टक्के झाला आहे.''

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार दिल्ली कॅपिटल्स संघाकजून खेळणार अशा चर्चांना उधाण आले होते. आता लवकरच या चर्चांवर शिक्कामोर्तब होणार आहे. अश्विनचा दिल्लीसोबतच करार आता पूर्ण झाला आहे. 

35 बळी घेऊनही विराटने हाकलले टीम बाहेर; आता रोहित मोजतोय किंमत

दिल्ली लवकरच करणार घोषणा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सने अश्विनसोबतचा करार पूर्ण केला असून लवकरच याबाबत घोषणाही केली जाईल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, ''हो अश्विन दिल्ली कॅपिटल्सला जॉईन करत आहे. आधी हा करार होऊ शकला नाही कारण तेव्हा पंजाबला ट्रेडमध्ये कोणते दोन खेळाडू उतरवावे हे कळत नव्हते. मात्र, आता त्यांनी निर्णय घेतला आहे आणि हा करार 99 टक्के झाला आहे.''

Image result for KXIP ashwin

पंजाबतर्फे 2018च्या लिलावात अश्विनशी सात कोटी 60 लाख रुपये रकमेचा करार करण्यात आला. गेली दोन वर्षे तो नेतृत्व करतो आहे. दोन्ही वेळा स्पर्धेच्या पहिल्या टप्यांत किंग्ज इलेव्हनने आशा उंचावल्या, पण शेवट निराशाजनक ठरला.

2018 मध्ये सातवे, तर गेल्या वर्षी सहावे स्थान अशी त्यांची घसरण झाली. गेल्या वर्षी सहा विजय आणि आठ पराभव अशी कामगिरी होती.

IPL 2020 : यंदा फक्त नोबॉलवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळा अंपायर 

अश्विन पंजाबकडूनच खेळणार हे स्पष्ट केले होते
आम्ही फेरविचार केला आणि ट्रेडिंग करायचे नाही असे ठरविले. अश्विन संघाचा अविभाज्य घटक आहे. आम्ही दिल्ली कॅपीटल्सबरोबर चर्चा केली होती, पण ती कधीच फलदायी ठरली नाही. अश्विनची क्रिकेट खेळण्याची पद्धत आणि कामगिरी त्याच्याविषयी खूप काही सांगून जाते.

चांगल्या प्रारंभानंतर घसरण 
किंग्ज इलेव्हनची आयपीएलमधील कामगिरी फारशी उल्लेखनीय नाही. 2008 मधील पहिल्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर त्यांना एकदाच प्ले-ऑफमध्ये जाता आले. 2014 मध्ये त्यांनी उपविजेतेपद मिळविले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravichandran Ashwin All Set To Join Delhi Capitals From Kings XI Punjab in IPL 2020