अश्विनची कमाल; कपिल पाजींना मागे टाकत नावे केला खास विक्रम

Ravichandran Ashwin overtakes Kapil Dev Record
Ravichandran Ashwin overtakes Kapil Dev RecordSakal

Ravichandran Ashwin overtakes Kapil Dev Record : श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटी सान्यातील पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अश्विनने गोंलदाजी करताना खास विक्रम आपल्या नावे केला. त्याने भारतीय संघाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांना मागे टाकले. कसोटीत त्याने 435 * विकेट आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. भारताकडून कसोटी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आता दुसऱ्या स्थानावर पोहचला. अनिल कुंबळे यांनी 619 विकेट घेतल्या होत्या.

चहापानापर्यंत श्रीलंकन संघाने 4 बाद 120 धावा केल्या होत्या. चरिथ असलंका 20(7) आणि अँजेलो मॅथ्यू 20(7) संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. ब्रेकनंतर कर्णधार रोहित शर्माने अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. त्याने याच षटकात असलंकाला कोहलीकरवी झेलबाद केले. या विकेट्सह त्याने कपिल पांजींच्या कसोटी विकेट्सच्या विक्रम मागे टाकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com