सर जडेजाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Ravindra Jadeja Nominated For Arjuna Award
Ravindra Jadeja Nominated For Arjuna Award

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची अर्जुन पुरस्कारसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याच्या सह इतर 19 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 

जडेजाने आतापर्यंत 156 एकदिवसीय , 42 ट्वेंटी20 तर 41 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2128 धावा केल्या आहेत. त्याने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये त्याने 135 तर कसोटी क्रिकेटमध्ये 1485 धावा केल्या आहेत. तसेच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 178, कसोटीमध्ये 192 तर ट्वेंटी20मध्ये 32 बळी घेतले आहेत. 

नुकतेच कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या नावाचीही राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. जडेजा सध्या भारतीय संघाबरोबर विंडीज दौऱ्यावर आहे. भारत आणि विंडीज यांच्यात 22 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com