रवींद्र जडेजाचा दणका; 'या' यादीत ठरला अव्वल!

शनिवार, 29 डिसेंबर 2018

मेलबर्न : फिटनेसपासून फलंदाजीपर्यंत विविध कारणांमुळे भारतीय संघाच्या आत-बाहेर करावे लागणाऱ्या रवींद्र जडेजाने संधी मिळेल तेव्हा टीकाकारांची तोंडे बंद करण्याचे काम ऑस्ट्रेलियामध्येही सुरुच ठेवले आहे. आश्‍विनच्या अनुपस्थितीत 'दुसरा' गोलंदाज म्हणून जडेजाला तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले. त्यानंतर त्याने या सामन्यात स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे. 

आतापर्यंत जडेजाने 40 कसोटींमध्ये एकूण 190 बळी घेतले आहेत. भारताचे महान गोलंदाज ईरापल्ली प्रसन्ना यांनी 49 कसोटींमध्ये 189 बळी घेतले होते. शिवाय, कारकिर्दीतील 40 कसोटींनंतर सर्वाधिक बळी घेणाऱ्या डावखुऱ्या गोलंदाजांमध्येही आता जडेजा अव्वल आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये अनेक दर्जेदार डावखुरे गोलंदाज झाले आहेत. पण पहिल्या 40 कसोटींनंतर सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये आता जडेजाच आघाडीवर आहे. त्याच्याखालोखाल ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन (175), मिचेल स्टार्क (170), ऍलन डेव्हिडसन (165) आणि बिल जॉन्स्टन (160) यांचा समावेश आहे. 

'दर्जेदार अष्टपैलू' म्हणून ऑस्ट्रेलियाने संघात स्थान दिलेल्या मिशेल मार्शला जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये चांगलेच सतावले आहे. आतापर्यंत मार्शला जडेजाने कसोटीमध्ये 70 चेंडू टाकले आहेत. त्यामध्ये केवळ 11 धावा देत जडेजाने मार्शला चार वेळा बाद केले आहे. 

Web Title: Ravindra Jadeja shines as he claims his 190th wicket in 40th test