चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद पुन्हा एमएस धोनीकडे | IPL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni Last IPL season

ब्रेकिंग : चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद पुन्हा धोनीकडे

चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद पुन्हा एकदा एमएस धोनीकडे (MS Dhoni) देण्यात आले आहे. यंदाच्या हंगामाला सुरूवात होण्यापूर्वी दोन दिवस आधीच अचानकपणे महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नेतृत्वपदाची माळ रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) गळ्यात पडली होती. मात्र यंदाच्या हंगामात सीएसकेला (CSK) फक्त 2 सामने जिंकण्यात यश आले. आता या अपयशानंतर पुन्हा एकदा कर्णधारपद धोनीकडे देण्यात आले आहे. (Ravindra Jadeja Steps Down & Hand Over Captaincy To MS Dhoni)

खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे

रवींद्र जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेचे एमएस धोनीला CSK चे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा: GT vs RCB Live : आरसीबीच्या फिरकीपुढे गुजरातची घसरण

चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 2 सामन्यात चेन्नईला विजय मिळवण्यात यश आले आहे. चेन्नईचे आता सहा सामने राहिले आहेत. जर त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांना जवळपास सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. अशा परिस्थिती चेन्नईने पुन्हा एकदा नेतृत्व धोनीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामाच्या मध्यावरच रविंद्र जडेजाकडून नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा धोनीकडे आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. गेल्या वर्षी देखील चेन्नईने विजेतेपदाला गवसणी घातली होती. यंदाच्या हंगामात महेंद्रसिंह धोनी चांगल्या टचमध्ये दिसत आहे. त्याने सीएसकेने जे काही दोन विजय मिळवून दिले आहेत त्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

Web Title: Ravindra Jadeja Steps Down And Hands Over The Captaincy Of Chennai Super Kings Csk Back To Ms Dhoni

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLMS Dhoni
go to top