रायुडूची प्रथमश्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती
हैदराबाद - अंबाती रायुडू याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. तो आता केवळ झटपट क्रिकेट खेळेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याची कसोटी मालिकेसाठी निवड झाली, पण त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याला वगळण्यात आले. आता झटपट क्रिकेटसाठी संघातील स्थान पक्के झाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समितीने रायुडू याच्यासारख्या प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सातत्य राखणाऱ्या खेळाडूंना डावलून अनपेक्षित निर्णय घेतले होते. त्यामुळे रायुडू याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.