सुवर्णपदकापर्यंत पोचण्यासाठी कठोर मेहनत : साईना

पीटीआय
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील विजेतेपदानंतर प्रेरित झालेली भारताची बॅडमिंटन क्वीन साईना नेहवाल आता ऑलिंपिक सुवर्णपदकाने झपाटली आहे. ऑलिंपिक सुवर्णपदकाचे स्वप्न गाठण्यासाठी सध्या आपण "हाफ स्मॅश‘ या तंत्रावर अधिक मेहनत घेत आहोत, असे तिने सांगितले.
 

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील विजेतेपदानंतर प्रेरित झालेली भारताची बॅडमिंटन क्वीन साईना नेहवाल आता ऑलिंपिक सुवर्णपदकाने झपाटली आहे. ऑलिंपिक सुवर्णपदकाचे स्वप्न गाठण्यासाठी सध्या आपण "हाफ स्मॅश‘ या तंत्रावर अधिक मेहनत घेत आहोत, असे तिने सांगितले.
 

ऑलिंपिकच्या तयारीविषयी बोलताना साईना म्हणाली, ""मोसमात अपयशाचा सामना करत असतानाच योग्य वेळी ऑस्ट्रेलियन विजेतेपद मिळाले. आत्मविश्‍वास उंचावण्यासाठी खरंच मला एखाद्या विजेतेपदाची आवश्‍यकता होती. अपयशाचा सामना करताना मला बदल हवा होता. या विजेतेपदाने माझी ऑलिंपिक तयारी योग्य दिशेने सुरू असल्याची खात्री मला मिळाली.‘‘ या कामगिरीनंतर आता प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मेहनत घेत आहे. तंत्र अधिक परिपक्व करण्याकडे भर देत असल्याचे सांगून साईना म्हणाली, ""प्रत्येक स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वाची असते. ऑलिंपिककडे मी अशीच एक स्पर्धा म्हणून बघते. स्पर्धेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि तो तसाच राहील. ऑलिंपिक सुवर्णपदक हे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी मी "हाफ स्मॅश‘चे तंत्र अधिक चांगल्या प्रकारे विकसित करण्यावर मी भर देत आहे.‘‘
 

साईना गेली दीड वर्षे विमलकुमार यांच्याकडे मार्गदर्शन घेत आहे. मी चॅंपियन बनू शकते हा विश्‍वास त्यांनीच माझ्या मनात जागवला, असे सांगून साईना म्हणाली, ""माझ्या कारकिर्दीत विमलकुमार यांना विशेष स्थान आहे. मी विजेती बनू शकते हा विश्‍वास त्यांनी मला प्रत्येक दिवशी दिला आणि त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. आतादेखील माझे "हाफ स्मॅश‘चे तंत्र बिनचूक करण्यासाठी त्यांचीच मदत होत आहे. सर्वोच्च स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणे सोपे नसते. या वेळी भारताचा सर्वांत मोठा संघ ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे सर्वाधिक पदके घेऊन भारतीय संघ परतेल अशी मला आशा वाटते. प्रत्येकाने आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी सर्वोत्तम देण्याची गरज आहे.‘‘

Web Title: To reach out to hard gold medal: Saina news

फोटो गॅलरी