ऑस्ट्रेलियन त्रिकुट फ्रीस्टाइल स्टंटसाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे - एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेतील पाचव्या फेरीसाठी प्रकाशझोतात फ्रीस्टाइल स्टंट करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे तीन रायडर पुण्यात दाखल झाले आहेत. शनिवारी मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाशेजारी मैदानावर ही स्पर्धा होत आहे.

पुणे - एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेतील पाचव्या फेरीसाठी प्रकाशझोतात फ्रीस्टाइल स्टंट करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे तीन रायडर पुण्यात दाखल झाले आहेत. शनिवारी मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाशेजारी मैदानावर ही स्पर्धा होत आहे.

गॉडस्पीड संस्थेच्या माध्यमातून श्‍याम कोठारी यांनी या मालिकेचे आयोजन केले आहे. शॉन वेब, जॅरेड मॉरिसन आणि ज्यो डफील्ड यांनी ट्रॅकची पहाणी केली. यातील वेब गतवर्षी स्टंटमध्ये सहभागी झाला होता. या वेळी पूल आणि त्याखालून बोगदा असा ट्रॅक आहे. फ्रीस्टाइल स्टंट करून रायडर पुलावर लॅंडिंग करतील. यासंदर्भात वेबने सांगितले की, गेल्या वर्षी प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. त्यामुळे सुखद आठवणी आहेत. यावर्षी पुलावर लॅंडिंग करणे रोमहर्षक ठरेल.

वेबला अलीकडेच पाठीची दुखापत झाली होती. चीनमध्ये स्टंट करताना तो पडला. त्यानंतर अजूनही उपचार सुरू असले आणि शंभर टक्के तंदुरुस्त नसला तरी तो स्टंट करणार आहे.

२० वर्षांच्या मॉरिसनने सांगितले की, पाच वर्षांचा असल्यापासून मी रायडिंग करतो आहे. १६व्या वर्षी मी व्यावसायिक परवाना मिळविला. सुपरक्रॉसचा अनुभव मला आहे. स्टंटच्या जोडीला रेसिंगची संधी मिळाली, तर जिंकण्याचे ध्येय राहील. ऑस्ट्रेलियात मी प्रत्येक प्रांतात रेसिंग केले आहे; पण हा पहिलाच परदेश दौरा आहे. शॉनने संपर्क साधल्यामुळे मला ही संधी मिळाली. मार्च महिन्यात मी स्टंट करताना पाठीवर पडलो. त्यात मणक्‍याला दुखापत झाली होती.

डफील्ड मूळचा न्यूझीलंडचा आहे. दोन वर्षांपासूनच तो स्टंट शिकायला लागला. वेबशी मैत्री झाल्यामुळे त्याला ही संधी मिळाली. या स्पर्धेतील सहभागामुळे एक वेगळा देश पाहायला मिळणार आणि रेसिंगप्रेमींना आनंदाची पर्वणी देता येणार याचा त्याला आनंद आहे.

Web Title: Ready for the Australian tri freestyle stunt