रेयाल माद्रिदने पटकाविले चँपियन्स लीगचे विजेतेपद

वृत्तसंस्था
रविवार, 4 जून 2017

रेयालच्या विजेतेपदानंतर - 
- युव्हेंट्‌सने यापूर्वी दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे, तर रेयाल माद्रिदने बारा वेळा. 
- या स्पर्धेत रेयालचे 503 गोल, पाचशे गोलचा टप्पा गाठणारा पहिला संघ
- रेयालकडून 1990 नंतर प्रथमच एक संघ सलग दोनदा विजेता होण्याची कामगिरी. यापूर्वी एसी मिलानकडून ही कामगिरी. 
- युव्हेंट्‌स यंदाच्या स्पर्धेत फक्त एक पराभव, एकही लढत न गमावता विजेतेपद जिंकण्याच्या मॅंचेस्टर युनायटेडच्या (2008) विक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी हुकली. 
- रोनाल्डोला चॅंपियन्स लीगमधील गोलांचे शतक

लंडन - ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलमुळे रेयाल माद्रिदने युव्हेंट्सचा 4-1 असा पराभव करत चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. रेयाल माद्रिदने गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविले असून, आतापर्यंतचे 12 वे विजेतेपद आहे.

इंग्लंडमधील कार्डीफच्या मैदानावर इटलीच्या युव्हेंट्‌स आणि स्पेनमधील रेयाल माद्रिद या दोन तुल्यबळ संघांमध्ये शनिवारी रात्री हा अंतिम सामना झाला. झिनेदिन झिदानच्या प्रशिक्षणासाठी रेयालने मिळविलेले हे विजेतेपद खास आहे. रेयाल माद्रिदने विजेतेपद मिळविलेल्या चार वर्षांतील तिन्ही अंतिम सामन्यांमध्ये रोनाल्डोने गोल केले आहेत. 

रोनाल्डोने 20 व्या मिनिटाला गोल करत रेयालला आघाडी मिळवून दिली. मात्र, युव्हेंट्सच्या मॅडुझिकने गोल करत सामन्यात बरोबरी केली. पूर्वाधात सामना बरोबरीत राहिल्यानंतर उत्तरार्धात रेयालने आक्रमक खेळावर जोर दिल्याने त्यांना यश आले. कॅसेमिरोने 61 आणि रोनाल्डोने 64 व्या मिनिटाला गोल करत रेयालची आघाडी 3-1 अशी वाढविली. अखेर 90 व्या मिनिटाला अॅसेनसिओने गोल करत रेयालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

रेयालच्या विजेतेपदानंतर - 
- युव्हेंट्‌सने यापूर्वी दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे, तर रेयाल माद्रिदने बारा वेळा. 
- या स्पर्धेत रेयालचे 503 गोल, पाचशे गोलचा टप्पा गाठणारा पहिला संघ
- रेयालकडून 1990 नंतर प्रथमच एक संघ सलग दोनदा विजेता होण्याची कामगिरी. यापूर्वी एसी मिलानकडून ही कामगिरी. 
- युव्हेंट्‌स यंदाच्या स्पर्धेत फक्त एक पराभव, एकही लढत न गमावता विजेतेपद जिंकण्याच्या मॅंचेस्टर युनायटेडच्या (2008) विक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी हुकली. 
- रोनाल्डोला चॅंपियन्स लीगमधील गोलांचे शतक

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले; 7 ठार
सांगली, कोल्हापूरला भूकंपाचा सौम्य धक्का​
नाशिकमध्ये शेतमालासाठी 'सुरक्षित कॉरिडॉर'​
'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''​
'आश्‍वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'​

Web Title: Real Madrid 4-1 Juventus, UEFA Champions League final