INDvsWI : विराटने केलेल्या 'त्या' ऍक्शनमागचे 'हे' आहे खरे कारण

Reason Behind Virat Kohlis Notebook Action in 1st T20 against West Indies
Reason Behind Virat Kohlis Notebook Action in 1st T20 against West Indies

हैदराबाद : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात झालेलया पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात भारताने विंडीजला सहा विकेट्स राखून पराभूत केले. भारताच्या या विजयात सर्वांत जास्त चर्चा झाली ती विराट कोहलीने गोलंदाज केसरिक व्हिल्यम्सला उद्देशून केलेल्या 'त्या' ऍक्शनची. 

त्याचे झाले असे की 2017मध्ये झालेल्या एका ट्वेंटी20 सामन्यात व्हिल्यम्सने कोहलीला बाद केल्यावर त्याची वहीत नोंद करुन घेतल्याची ऍक्शन केली होती. कोहलीने तीच ऍक्शन लक्षात ठेवली होती.  त्याने कालच्या सामन्यात व्हिल्यम्सला षटकार मारल्यावर त्याच्याट स्टाईलमध्ये त्याला ती ऍक्शन करुन दाखवत प्रत्युत्तर दिले.  

विराटला खुन्नस देण्याची चुक नेहमीच प्रतिस्पर्ध्यांना महागात पडते याची माहिती असूनही वेस्ट इंडीज खेळाडूंनी संकट ओढावून घेतले. वेस्ट इंडीजचे काही गोलंदाज विकेट घेतल्यावर वेगवेगळी कृती करतात विराटने त्यांना षटकार मारल्यावर आज तशीच कृती करून उत्तर दिले यावरून त्याचा राग स्पष्ट होत होता. हा राग अर्थात त्याने बॅटमधूनही व्यक्त केला. त्यामुळे रोहित शर्मा स्वस्तःत बाद होऊनही भारताने 208 धावांचे लक्ष्य पार केले. 

सामन्यानंतर त्या ऍक्शनविषयी बोलताना तो म्हणाला, ''त्याने कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये नाही तर माझी विकेट घेतल्यावर असं सेलिब्रेशन केलं होतं. म्हणून मीसुद्धा माझ्या वहीत नोंद करुन घ्यावी म्हटलं. आमच्या थोडं बोलणं झालं पण नंतर आम्ही हसायला लागलो. स्पर्धात्मक क्रिकेट पाहण्यातच तर मजा असते, खुन्नस देऊन खेळा पण प्रतिस्पर्ध्यांचा आदर करा, हेच तर क्रिकेट आपल्याला शिकवते.''

2017मधील तो क्षण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com