मॅंचेस्टर महिला डर्बीला 31 हजारांचा प्रतिसाद

मँचेस्टर महिला डर्बी लढतीतील चुरशीचा क्षण
मँचेस्टर महिला डर्बी लढतीतील चुरशीचा क्षण

मॅंचेस्टर : विश्‍वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेमुळे ब्रिटनमध्ये महिला फुटबॉलची लोकप्रियता वाढत आहे, त्यासाठी प्रीमियर लीगमधील क्‍लब आपल्या महिला संघांच्या लढती मुख्य स्टेडियमवर घेत आहेत. आता त्यामुळेच मॅंचेस्टर सिटी आणि मॅंचेस्टर युनायटेड यांच्यातील लढतीला एतिहाद स्टेडियमवर विक्रमी प्रतिसाद लाभला.

महिला सुपर लीगमधील यापूर्वीचा सर्वाधिक प्रतिसाद 5 हजार 265 चाहत्यांचा होता. आता या मॅंचेस्टर डर्बीसाठी 31 हजार 213 चाहत्यांनी सात पौंडाचे तिकीट काढले असल्याचे सांगितले जात आहे. या लढतीत सिटीने 1-0 बाजी मारली, पण खेळापेक्षा प्रतिसादाचीच चर्चा जास्त आहे.

चेल्सी आणि टॉटनहॅम लढतीस 40 हजार चाहते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. लढतीचे तिकीट मोफत असले तरी त्याची नोंदणी आवश्‍यक होती. चाळीस हजारांचा टप्पा पहिल्या चार दिवसांतच गाठल्याचे सांगितले जात आहे.

महिला क्‍लासिकोमध्ये बार्सिलोनाचा धडाका
बार्सिलोनाने रेयाल माद्रिदच्या महिला संघाचा 9-1 असा धुव्वा उडवला. सीडी टॅकोन हा मूळचा संघ रेयालने जूनमध्ये विकत घेतला. त्यासाठी 5 लाख युरो मोजल्याची चर्चा आहे. टॅकोनच्या मूळच्या खेळाडूंनी रेयाल संघाचा पोषाख परिधान केला होता. मात्र ते ताकदवान बार्सिलोनास हारवू शकले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com