Rinku Singh : 6, 6, 6, 4, 4... पहिल्याच डावात रिंकूचा धमाका, ऋुत अन् संजूची जोडी देखील जमली

Rinku Singh
Rinku Singhesakal

Ireland Vs India 2nd T20I : भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंविरूद्ध विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून सलामीवीर आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाडने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावा चोपल्या. (Rinku Singh News)

संजू आणि ऋतुच्या 71 धावांच्या भागीदारीनंतर रिंकू सिंहने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय डावात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने स्लॉग ओव्हरमध्ये 21 चेंडूत 38 धावा करत भारताला 180 च्या पार पोहचवले. त्याने आपल्या या 180 च्या स्ट्राईक रेटने केलेल्या खेळीत 3 षटकार आणि दोन चौकार मारले. त्याला शिवम दुबेने 16 चेंडूत नाबाद 22 धावा करत चांगली साथ दिली.

Rinku Singh
IRE vs IND 2nd T20 LIVE : रिंकू सिंह - शिवम दुबेची फटकेबाजी, भारताचे आयर्लंडसमोर 186 धावांचे आव्हान

आयर्लंडविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. सलामीवीर यशस्वी जैसवालने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. त्याला दुसऱ्या बाजूने ऋतुराज गायकवाड चांगली साथ देत होता.

मात्र पॉवर प्लेमध्येच क्रेग यंगने यशस्वीला 18 धावांवर बाद केले. त्यानंतर आललेला तिलक वर्मा देखली 2 चेंडू खेळून माघारी परतला. त्याला बॅरी मॅककार्थीने बाद केले. पाठोपाठ दोन विकेट पडल्यानंतर आलेल्या संजू सॅमसन आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी भारताचा डाव सावरला.

या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली. यामुळे 12 व्या षटकातच भारताचे शतक धावफलकावर लागले. या भागीदारीत आक्रमक फलंदाजीची जबाबदारी संजू सॅमसन निभावत होता तर ऋतुराज हा अँकर इनिंग खेळत होता.

Rinku Singh
ODI World Cup 2023 : ज्यावेळी चाहते स्टेडियममध्ये येणंच बंद करतील तेव्हा.... बीसीसीआयवर लोकं एवढे का भडकले?

दोघेही आपले अर्धशतक पूर्ण करण्याच्या तयारीत असतानाच बेंजामिन व्हाईटने 26 चेंडूत 40 धावा करणाऱ्या संजूचा त्रिफळा उडवला. संजू बाद झाल्यानंतर ऋतुराजने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र बॅरी मॅककार्थीने ऋतुराजला 58 धावांवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

ऋतुराज बाद झाल्यानंतर रिंकून स्लॉग ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी केली. रिंकूने आधी ऋतुराज आणि नंतर शिवन दुबे यांच्या साथीने शेवटच्या दोन षटकात तब्बल 42 धावा चोपत भारताला 20 षटकात 5 बाद 185 धावांपर्यंत पोहचवले. रिंकूने 21 चेंडूत 38 तर शिवम दुबेने 16 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या.

(Sports Latest News)

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com