तिरंदाज लक्ष्मीराणी ऑलिंपिकमधून बाहेर

सोमवार, 8 ऑगस्ट 2016

रिओ डि जानिरो : भारताची सूर हरपलेली तिरंदाज लक्ष्मीराणी मांझी आज (सोमवार) झालेल्या महिला एकेरीच्या स्पर्धेतूनही बाहेर पडली. स्लोव्हाकियाच्या अलेक्‍झांड्रा लोंगोव्हा हिच्याकडून लक्ष्मीराणीला पराभव स्वीकारावा लागला.

महिला सांघिक प्रकारामध्येही लक्ष्मीराणीचे तीर अनेकदा भरकटले. याचा फटका संघाला बसला होता. आता वैयक्तिक स्पर्धेतही लक्ष्मीराणीला मोक्‍याच्या क्षणी खेळ उंचावता आला नाही. पहिले दोन्ही सेट गमावल्यानंतर लक्ष्मीराणीवर दडपण आले होते. तिसऱ्या सेटमध्ये बरोबरी साधत तिने एक गुण मिळविला. पण चौथ्या आणि महत्त्वाच्या सेटची सुरवातच खराब झाल्याने लक्ष्मीराणीचा पराभव तिथेच निश्‍चित झाला होता.

दुसरीकडे, अलेक्‍झांड्राला चांगला सूर गवसला होता. तिने तीन वेळा ‘परफेक्‍ट 10‘ गुण मिळविले. लक्ष्मीराणीला ही कामगिरी एकदाच करता आली.

Web Title: RIO

टॅग्स