रिओ ऑलिंपिक गोल्फसाठी लाहिरी, चौरासिया, आदिती

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जुलै 2016

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिकमध्ये अनिर्बन लाहिरी, शिवशंकरप्रसाद ऊर्फ एसएसपी चौरासिया आणि आदिती अशोक गोल्फमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. ११२ वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये गोल्फचे पुनरागमन होत आहे.

पात्रतेसाठी ११ जुलैची ‘कट-ऑफ’ तारीख होती. आंतरराष्ट्रीय गोल्फ महासंघाने (आयजीएफ) क्रमवारी नक्की केली. जागतिक क्रमवारीचाच त्यासाठी निकष होता. लाहिरी आशियात अव्वल, तर जगात ६२ वा आहे. इंडियन ओपन विजेता चौरासिया २०७व्या क्रमांकावर आहे. ‘आयजीएफ’ क्रमवारीनुसार लाहिरी २०वा, तर चौरासिया ४५वा आहे. ६० खेळाडूंच्या स्पर्धेतील त्यांचे स्थान नक्की झाले.

लाहिरीने सात आंतरराष्ट्रीय विजेतीपदे मिळविली आहेत. तो यंदा प्रतिष्ठेच्या ‘पीजीए टूर’वर सहभागी झाला. गेल्या मोसमात त्याने ‘युरोपीय टूर’वर दोन विजेतीपदे मिळविली, तर ‘पीजीए चॅंपियनशिप’मध्ये संयुक्त पाचवा क्रमांक मिळविण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी त्याने नोंदविली. गेल्या वर्षी त्याने प्रेसिडेंट्‌स करंडकासाठी आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळविले. याबाबतीतही तो पहिला भारतीय ठरला. चौरासियाने चार आंतरराष्ट्रीय विजेतीपदे मिळविली आहेत. यातील तीन ‘युरोपीय टूर’वरील आहेत. इंडियन ओपनमधील बहुप्रतीक्षित यश त्याने यंदा मिळविले. त्यामुळे ऑलिंपिक सहभागाच्या त्याच्या आशा पल्लवित झाल्या.

आदिती १८ वर्षांची आहे. ती क्रमवारीत ५८वी आहे. गेल्या मोसमात तिने ब्रिटिश हौशी महिला स्पर्धेसह तीन विजेतीपदे मिळविली.

Web Title: Rio Olympic golf for Lahiri, Chaurasia, Aditi