रिषभ पंतचा 'वर्ल्ड कप'साठी विचार; धोनीचं काय होणार? 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 जानेवारी 2019

ऍडलेड : अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या सध्याच्या खराब फॉर्मकडे पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाने विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनीच यासंदर्भातील संकेत दिले आहेत. 

रिषभ पंतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान देण्यात आले होते. एकदिवसीय मालिकेसाठी त्याला वगळण्यात आले होते. पण 'रिषभ पंतला वगळले नाही. त्याला विश्रांती देण्यात आले होते', असा खुलासा प्रसाद यांनी केला. 

'रिषभ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरवातीपासून खेळत आहे. तो या दौऱ्यात तीन ट्‌वेंटी-20 आणि चार कसोटी खेळला आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय झाला आहे. त्याला पूर्ण दोन आठवड्यांची विश्रांती हवी होती. त्यानंतर त्याच्या समावेशाविषयी निर्णय घेतला जाईल. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यांमधील त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. पण संघ व्यवस्थापनाच्या दृष्टीने विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संभाव्य संघामध्ये पंतचा निश्‍चितच विचार केला जात आहे', असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. 

कसोटीमधून निवृत्ती घेतली असली, तरीही धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अजूनही धोनीच पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक आहे. पण फलंदाजीतील त्याची कामगिरी समाधानकारक नाही. त्यामुळे आगामी काही सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीकडे बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे राखीव यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिक किंवा पंतचा गांभीर्याने विचार सुरू आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rishabh Pant in the scheme of things for 2019 Cricket world cup