टीम इंडियाकडून फेल ठरला आता रिषभ पंत खेळणार या संघाकडून

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतवर सध्या क्रिकेट मेहरबान नाही. भारतीय संघातून खेळताना त्याला गेल्या अनेक दिवसांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. नुकत्याच झालेल्या विंडीज दौऱयात आणि सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पंतला धावा करण्यात अपयश आले आहे. पंतला आता विजय हजारे करंडकासाठी दिल्लीच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतवर सध्या क्रिकेट मेहरबान नाही. भारतीय संघातून खेळताना त्याला गेल्या अनेक दिवसांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. नुकत्याच झालेल्या विंडीज दौऱयात आणि सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पंतला धावा करण्यात अपयश आले आहे. पंतला आता विजय हजारे करंडकासाठी दिल्लीच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

विराटला कर्णधारपदारून दूर करणार? वाचा कुठे सुरुयेत खलबतं

विजय हजारे करंडक 24 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी दिल्लीच्या संघाने बुधवारी (ता.18) संघ जाहीर केला आहे. दिल्लीच्या संघाने रिषभ पंतला संघात स्थान दिले आहे. त्याबरोबर सध्या आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत भारतीय संघात असलेल्या नवदीप सैनीचाही समावेश आहे. 

दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद ध्रुव शोरेकडे देण्यात आले आहे. पंत विजय हजारे करंडकातील केवळ सुरवातीचे सामने खेळणार आहे. कारण त्यानंतर तो भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सामील होईल. 

रेयाल माद्रिदची पीछेहाट कायम

दिल्लीचा संघ : ध्रुव शोरे (कर्णधार), नितीश राणा, रिषभ पंत, हिम्मत सिंग, हितेन दलाल, कुणाल चंडेला, ललित यादव, पवन नेगी, नवदीप सैनी, सुबोध भाटी, कुलवंत खेजरोलिया, मनन शर्मा, कुंवर भिदुरी, विकास टोकस, तेजस बरोका, अनुज रावत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rishabh Pant selected in Delhi team for Vijay Hazare Trophy