एकटा रिषभ पंत भिडतोय ऑस्ट्रेलियाला (व्हिडिओ)

शनिवार, 29 डिसेंबर 2018

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांच्यात सुरु असलेले वाकयुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीही सुरू होतं. 'तात्पुरता कर्णधार' असा उल्लेख करत पंतने पेनला डिवचले. 

या मालिकेमध्ये 'स्लेजिंग' मर्यादित असले, तरीही पंत आणि पेन यांच्यात पहिल्या कसोटीपासून शाब्दिक चकमकी झडत आहेत. पंत फलंदाजीला उतरतो, तेव्हा पेन काही ना काही टिप्पणी करत असतो आणि पेन फलंदाजी करत असताना पंत त्याचे उट्टे काढतो. हाच खेळ आज (शनिवार) मेलबर्न कसोटीतही झाला. 

तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी चहापानापूर्वी पेन फलंदाजीस उतरला. तेव्हा 'तात्पुरता कर्णधार आला बघा!' अशा शब्दांत पंतने त्याचे स्वागत केले. 'याला फक्त बोलताच येतं. कधी तात्पुरता कर्णधार पाहिला आहे का? त्याला बाद करण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही', असे 'स्लेजिंग'ही पंत करत होता. पंतची बडबड इतकी होती, की पंच इयान गुल्ड यांनी ते षटक संपल्यानंतर त्याच्याशी 'चर्चा'ही केली. 

पेननेही काल पंत फलंदाजी करत असताना शेरेबाजी केली होती. 'एकदिवसीय संघात आता महेंद्रसिंह धोनी परत आला आहे. तू आता होबार्टकडून खेळायला सुरवात कर किंवा बेबीसीटिंग कर', असा 'सल्ला' काल पेनने दिला होता. हे लक्षात ठेवत पंतने पेनला असेच तिखट प्रत्युत्तर दिले. 

Web Title: Rishabh Pant sledging Australia Captain Tim Paine