रॉजर फेडररचा अमेरिकन ओपनमध्ये लाजिरवाणा पराभव

वृत्तसंस्था
Wednesday, 4 September 2019

अमेरिकन ओपन स्पर्धेत स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. बल्गेरियाच्या ग्रिगर दिमित्रोव याने फेडररचा 3-6,6-4,3-6,6-4,6-2 असा पराभव केला. त्यामुळे अमेरिकन ओपनमधून फेडररला बाहेर पडावे लागले आहे. 

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन स्पर्धेत स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. बल्गेरियाच्या ग्रिगर दिमित्रोव याने फेडररचा 3-6,6-4,3-6,6-4,6-2 असा पराभव केला. त्यामुळे अमेरिकन ओपनमधून फेडररला बाहेर पडावे लागले आहे. 

आतापर्यंत सात वेळा हे दोघे एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. या सातही सामन्यांमध्ये फेडररने बाजी मारली आहे मात्र, आज दिमित्रोवने त्याला पराभूत केले. सामन्याच्या उत्तरार्धात त्याचया पाटीला दुखापत झाल्याने त्याला उपचार घ्यावा लागला. ''मला माझ्या दुखापतीची सामनाभर जाणीव होत राहिली मात्र, मी खेळू शकत होतो,'' असे त्याने स्पष्ट केले. 

Image

दिमित्रोव आता रशियाच्या दानिल मदव्हेदेव्हच्या विरुद्ध खेळणार आहे. दानिल सध्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roger Federer knocked out of US Open by Grigor Dimitrov