रॉजर फेडरर जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

''हा सामना प्रचंड अटीतटीचा होता. या सामन्यात कोणीही बाजी मारु शकले असते. पण मी हा सामना जिंकल्यामुळे आणि पुन्हा प्रथम स्थानी आल्याने खुश आहे. अंतिम सामना खेळण्यासाठी मी उत्सुक आहे''

स्टुटगार्ट : स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने स्टुटगार्ट ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत जागतिक क्रमवारीतील आपले अव्वल स्थान पुन्हा निश्चित केले. फेडररने स्टुटगार्ट ओपनच्या उपांत्य फेरीत नीक किर्ग्योसवर 6-7, 6-2, 7-6 असा विजय मिळवला. अंतिम फेरीत त्याचा सामना कॅनडाच्या मिलोस राओनीकशी होणार आहे. 

मागील 11 आठवड्यात फेडरर एकही सामना खेळलेला नाही. स्टुटगार्ट ओपनचा पहिला सामना हरल्यानंतर फेडरर ग्रास कोर्टवरील सलग 15 सामने जिंकला आहे. उपांत्य फेरीतील या विजयाबरोबरच त्याने पारंपारिक प्रतिस्पर्धी राफेल नदालला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या वर्षात फेडररने आतापर्यंत तीनवेळा जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे. सध्या फेडररचे 8820 गुण आहेत तर नदालचे 8770 गुण आहेत. 

''हा सामना प्रचंड अटीतटीचा होता. या सामन्यात कोणीही बाजी मारु शकले असते. पण मी हा सामना जिंकल्यामुळे आणि पुन्हा प्रथम स्थानी आल्याने खुश आहे. अंतिम सामना खेळण्यासाठी मी उत्सुक आहे'', असे फेडररने याने सांगितले.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची अॅशलीह बार्टीने नॉटिंगहम ओपनमधील आपली घौडदोड कायम ठेवत अंतिम फेरीत मजल मारली आहे. अंतिम फेरीत तिचा सामना जोहाना कोंटाशी होणार आहे. उपांत्य फेरीत बार्टीने जपानच्या नाओमी ओसाकाला सलग दोन सेटमध्ये 6-3 6-4 असे हरवले. या विजयामुळे तिचा विम्बल्डन स्पर्धेसाठी आत्मविश्वास वाढला आहे.

Web Title: Roger Federer to reclaim world No. 1 spot in tennis ATP