IND vs AUS : "ओये गिल..." ; रोहित शर्माची मैदानावर शिवीगाळ, शुभमनचा संयम सुटला... - Rohit Sharma abused Shubman Gill during the India-Australia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit sharma

IND vs AUS : "ओये गिल..." ; रोहित शर्माची मैदानावर शिवीगाळ, शुभमनचा संयम सुटला...

भारत-ऑस्टेलियामध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी दरम्यान कर्णधार रोहित शर्मा थोडा रागात दिसला. कोणत्यातरी गोष्टींवर त्याने सलामी फलंदाज शुभनम गिलला फटकारले. हलक्या शब्दात रोहितने असभ्य भाषेचा वापर केला. गिलने सामन्यादरम्यान केलेल्या अयोग्य वर्तनाला रोहितने प्रत्युत्तर दिले होते. 

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १३३व्या षटकात ही घटना घडली. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ६ विकेट ३८४ धावांवर पडल्या होत्या. उस्मान ख्वाजा १६४ आणि मिचेल स्टार्क ४ धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित होते. तेव्हाच स्टंपच्या माईकवर रोहित शर्माचा आवाज रेकॉर्ड झाला. प्रसारक गर्दीचे शॉट्स ऑन कॅमेरा दाखवत असल्याने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली नाही. मात्र आवाज रेकॉर्ड झाला. 

कांगारूंचा पहिला डाव ४८० धावांवर आटोपला-

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राअखेर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला. आर अश्विनने डावात ६ बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियाला ४८० धावांवर ऑल आऊट केले. उस्मान ख्वाजाने १८० तर कॅमेरून ग्रीनने ११४ धावा केल्या.

यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने आपल्या पहिल्या डावात १० षटकात बिनबाद ३६ धावा केल्या. सलामीवीर शुभमन गिल १८ तर रोहित शर्मा १७ धावांवर नाबाद राहिले.

टॅग्स :Rohit Sharmatest cricket