मॅचसोडून रोहित मेव्हण्याच्या लग्नाला गेला अन् गावसकरांना राग आला! - Rohit Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

Rohit Sharma : मॅचसोडून रोहित मेव्हण्याच्या लग्नाला गेला अन् गावसकरांना राग आला!

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका गमावली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या वनडेत भारताला २७० धावा करायच्या होत्या. मात्र टीम इंडियाचा २१ धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियावर टिका होत आहे.

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कर्णधार रोहित शर्माबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. रोहित पहिला वनडे खेळला नाही म्हणून गावसकर संतापले आहेत.

रोहित शर्मा पहिल्या वनडे सामना सोडून पत्नीच्या भावाच्या लग्नात गेला होता. त्यामुळे तो पहिला सामना खेळला नाही. यावर गावसकर म्हणाले, जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा आपत्कालीन परिस्थिती सोडून कुटुंबासाठी कुठेही जागा नसते.

एका कर्णधाराने नेहमी प्रत्येक मॅचला हजर राहावे. रोहित शर्माला प्रत्येक मॅच खेळ्याची गरज आहे. तुमच्याकडे असा कर्णधार असू शकत नाही जो एक सामना खेळेल आणि बाकीच्या सामन्यांसाठी अनुपस्थित असेल.ही एक महत्त्वाची गोष्ट असल्याचे गावसकर म्हणाले.

गावसकर म्हणाले, मला माहित आहे की रोहित शर्मा कुटुंबामुळे पहिला सामना खेळला नाही. मात्र जेव्हा विश्वचषकचा प्रश्न येईल तेव्हा कुटुंबाला सोडावे लागते. यापूर्वीच खेळाडूने सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या. आपत्कालीन परिस्थिती असल्याशिवाय सामना सोडणे योग्य नाही. तसेच नेतृत्वात सातत्य असने आवश्यक आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याने कर्णधारपद भूषवले आणि भारताने तो सामना जिंकला. यानंतर रोहितचे पुनरागमन झाले आणि भारतीय संघाने दोन्ही एकदिवसीय सामने गमावले आणि मालिकाही हातातून निसटली.