INDvsBAN : आम्ही विसरलोच मुशफिकूर बुटका आहे : रोहित शर्मा

Rohit Sharma opens up on wrong DRS decision against Bangladesh in 1st T20
Rohit Sharma opens up on wrong DRS decision against Bangladesh in 1st T20

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात भारताला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच आघाड्यांवर भारतीय संघ कमी पडला. मात्र, रिषभ पंतचा DRS चा चुकीचा निर्णय सर्वाधिक गाजला. कर्णधार रोहित शर्माला सामन्यानंतर याबद्दल विचारल्यावर त्याने अत्यंत अजब उत्तर दिले. 

सामन्यानंतर त्याला रिषभ पंतच्या रिव्ह्यूच्या निर्णयाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, ''संघ डीआरसचा निर्णय घेण्यात चुकला आणि त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. मुशफिकूरने पहिला चेंडू बॅकफूटवर खेळला त्यावेळी आम्हाला वाटले की चेंडू लेगसाईडच्या बाहेर जात आहे. दुसरा चेंडू तो फ्रंटफूटवर खेळला मात्र, आम्ही विसरलोच मुशफिकुर बुटका आहे.''

मुशफिकूरची उंची केवळ 5.2 फूट आहे. त्यामुळे चेंडू जर त्याच्या पॅडच्या वरच्या भागास जरी लागला तरी तो पायचित होऊ शकतो.  रिषभ पंत डीआरएसचा निर्णय घेण्यात चुकला. मात्र, रोहितने त्याच्यावर फक्त हसून रिअॅक्शन दिली.

दिल्लीच्या खेळपट्टीवरून चेंडू कमी वेगाने येतो, पण तिथे आयपीएलच्या लढती खेळण्याचा अनुभवही उपयोगी पडला नाही, त्याच वेळी ही फलंदाजी कशी असावी हे मुशफीकरने दाखवले. त्याने सौम्या सरकारसह 60 आणि महमदुल्लासह 30 धावांची भागी करीत बांगलादेशला विजयी केले.

लक्षवेधक
- भारत बांगलादेशविरुद्ध ट्‌वेंटी 20 मध्ये प्रथमच पराजित. यापूर्वीच्या आठ लढतीत विजय
- सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्‌वेंटी 20 खेळण्याच्या भारतीय क्रमवारीत रोहित शर्मा (99) अव्वल. महेंद्रसिंग धोनीच्या 98 लढती
- रंजन मदुगल यांचा सामनाधिकारी या नात्याने शंभरावा सामना. केवळ जेफ क्रो यांच्याच (119) लढती जास्त
- भारतीय संघात पाच डावखुरे फलंदाज. ट्‌वेंटी 20 लढतीत हे पाचव्यांदा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com