IND vs AUS : अक्षरला सूर्यकुमारच्या आधी का पाठवले? रोहित शर्मा म्हणाला, "त्याच्या उपस्थितीने..."

rohit sharma
rohit sharma

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियाने बॅटिंग लाईनअपमध्ये बदल करण्यात आला होता. त्यामुळे टिम इंडियावर टिका होत आहे. अक्षर पटेलला सूर्यकुमार ऐवजी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. याबाबत कर्णधार रोहित शर्मा याने स्पष्टीकरण दिले आहे.

रोहित शर्मा म्हणाला, राहुल आणि कोहली जेव्हा फलंदाजी करत होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने लेगस्पिनर स्पिनर लावला होता. सूर्याला सुरुवातीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचे होते पण चेंडू काही वळण घेत नाही, असे आम्हाला वाटले. आमच्या उजव्या हाताच्या फलंदाजाला अडचण येऊ नये म्हणून आम्ही डावखुरा अक्षर याला फलंदाजीसाठी पाठवले.

अक्षर पटेल पाच नंबरवर जाऊन देखील फक्त २ धावा करू शकला. यावेळी रोहित शर्माने शेवटच्या सामन्यात संघात तिन फिरकीपटू ठेवल्यार देखील भाष्य केले.

अक्षरच्या उपस्थितीने फलंदाजीला बळ मिळाले असते.आम्ही खालच्या क्रमाने आमची फलंदाजी मजबूत करण्याविषयी योजना आखली होती. त्यामुळे आम्ही तीन फिरकीपटूंसोबत खेळलो. विकेट पाहून त्यावर तीन फिरकीपटूंसह खेळणे योग्य ठरेल, असा विश्वास वाटल्याचे रोहितने सांगितले.

rohit sharma
IPL 2023 : कर्णधार अय्यरनंतर KKR ला आणखी एक मोठा धक्का! आता 'हा' स्टार गोलंदाज जखमी

रोहित म्हणाला, आम्ही काय चूक केली आणि काय चांगले केले याचे विश्लेषण करण्यासाठी नऊ सामने पुरेसे आहेत. या मालिकेपर्यंत आम्ही सातत्यपूर्ण क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे एका बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध संघ म्हणून काय करावे लागेल, हे गेल्या दोन सामन्यांवरून समजू शकते, याचा भविष्यात देखील फायदा होणार आहे.

rohit sharma
Shreyas Iyer : 'मी नाही करणार सर्जरी...' अय्यरने बीसीसीआयचा सल्ला नाकारला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com