
Rohit Sharma : अश्विन - जडेजानं भंडावून सोडलं; रोहित म्हणाला यांना आपली रेकॉर्ड्स...
Rohit Sharma Ravindra Jadeja Ravichandran Ashwin : भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटीत 1 डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून फलंदाजीत रोहित शर्मा (120), रविंद्र जडेजा (70), अक्षर पटेल (84) यांना मोठे योगदान दिले. तर गोलंदाजीत अश्विनने 8 तर रविंद्र जडेजाने 7 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात जडेजाना 5 तर दुसऱ्या डावात अश्विनने 5 विकेट्स घेत भारताचा विजय सोपा केला.
मात्र या दोघांनी दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माचे चांगलेच डोके खाल्ले. रोहित शर्माने सामना झाल्यानंतर समालोचकांशी संवाद साधला. यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, 'रविंद्र जडेजा हा 249 विकेट्सवर होता. तो माझ्याकडे गोलंदाजी मागत होता. तर अश्विनने 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्याला 5 विकेट्स पूर्ण करायच्या होत्या. तोही माझ्याकडे बॉलिंग मागत होता. आज माझ्यासमोर हेच मोठे आव्हान होते. या लोकांना आपले माईल स्टोन्स चांगलेच माहिती असतात.'
रोहित पुढे म्हणाला की, 'आमच्याकडे अश्विन, जडेजा आणि अक्षर हे तिघेही आहेत हा आम्हाला मिळालेला आशीर्वादच आहे.'
रोहित शर्माला त्याच्या कसोटीतील फलंदाजीबद्दल विचारल्यावर तो म्हणाला की, 'गेल्या दोन वर्षापासून आम्ही भारतात ज्या खेळपट्ट्यांवर खेळतोय ते पाहता तुम्हाला धावा करण्यासाठी काही प्लॅन्स कार्यान्वित करावे लागतात. मी मुंबईत वाढलो आहे. तेथे खूप फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या आहेत. तेथे तुम्हाला पठडीच्या बाहेर जाऊन खेळावे लागते.'
रोहित पुढे म्हणाला की, 'तुम्हाला फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तुमच्या फूटवर्कचा जास्त वापर करावा लागतो. तुम्हाला काहीतरी वेगळं करून गोलंदजांवर दबाव निर्माण करावा लागतो. हे वेगळं म्हणजे तुम्हाला जे सूट होते. त्यात फूटवर्क, स्वीप, रिव्हर्स स्वीप यांचा वापर करणे आलं.'